हिरव्या तुरीच्या दाण्यांची खिचडी
HirvyaTurichya Danyanchi Khichadi in English पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे बनवण्यासाठी लागणारा वेळ : २० ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/hirvya-turichya-danyanchi-khichadi_21.html
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) १ वाटी हिरव्या तुरीचे दाणे
२) १ वाटी कोलम तांदुळ
३) अडीच वाटी पाणी
४) १ कांदा
५) १ टोमॅटो
६) २-३ हिरव्या मिरच्या
७) ५-६ कढीपत्त्याची पाने
८) १/२ वाटी बारिक चिरलेली कोथिंबीर
९) १ छोटा चमचा हळद
१०) १ छोटा चमचा जिरे
११) २ छोटे चमचे पुलाव मसाला
१२) १/२ वाटी तूप
१३) मीठ आवडीनुसार
कृती:
कूकर मध्ये तूप गरम करून त्यात जिरे, कढीपत्त्याची पाने व बारिक चिरलेली हिरवी मिरची घालून परतावे.
बारिक चिरलेला कांदा घालून १ मिनिटे परतावा व लगेचच तुरीचे दाणे घालावे.
तांदुळ निवडून स्वच्छ धुवून घ्यावे व वरील दाण्यावर घालून २-३ मिनिटे परतावे.
दुसऱ्या बाजूला पाणी गरम करत ठेवावे.
पाण्याला उकळी आले की लगेचच हे पाणी वरील मिश्रणात घालावे व एक उकळी येवू दयावी.
आता हळद, पुलाव मसाला, मीठ व बारिक चिरलेला टोमॅटो घालावा.
कुकरला झाकण लावून मंद ग्यासवर ३-४ शिट्ट्या काढाव्यात.
कूकर थंड झाला की खिचडी काढून त्यावर बारिक चिरलेली कोथिंबीर व तूप घालून घ्यावे.
गरमच दह्यासोबत सर्व्ह करावी.