विर्दभ स्पेशल सोल्याची भाजी
Solyachi Bhaji in English तयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे बनवण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे २ व्यक्तींसाठी . सा...
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/solyachi-bhaji.html
तयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) १ वाटी हिरवी तूर
२) १ कांदा
३) २-३ छोटे चमचे आल लसूण पेस्ट
४) १ टोमॅटो
५) २-३ हिरव्या मिरच्या
६) १/२ वाटी बारीक़ चिरलेली कोथिंबीर
७) १ छोटा चमचा लाल मिरची पूड
८) १ छोटा चमचा हळद
९) १ छोटा चमचा जिरे पूड
१०) १/२ वाटी तूप
११) २ चमचे तेल
१२) मीठ चवीनुसार
कृती:
एका भांडयात थोडस तेल गरम करून त्यात तुरीचे दाणे २-३ मिनिटे परतून घ्यावे.
आचेवरून बाजूला घेवून थंड होवू दया.
एकदाका थंड झाले की लगेचच मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्या (क्रश करून घ्या).
उरलेल तेल त्याच भांडयात घालून गरम करावे त्यात बारीक़ चिरलेला कांदा घालून लालसर परतून घ्यावा.
त्यावर आल लसूण पेस्ट, हिरवी मिरची व कोथिंबीरिची पेस्ट घालून परतावे.
लाल मिरची पूड, हळद व जिरे पूड घालून परतावे.
साधारण २-३ मिनिटांनी वाटून घेतलेले तूर घालावे.
मीठ घालावे.
पुरेसे पाणी व बारीक़ चिरलेला टोमॅटो घालावा.
झाकण ठेवून ५ मिनिटे बारीक़ गॅसवर शिजू दयावे.
गॅस बंद करून बाजूला करावे.
चवीनुसार किंवा आवडीनुसार तूप घालून गरमच चपातीसोबत सर्व्ह करावे.