तिळाचे लाडू । तिळगूळ
TilacheLadoo | Sesame Ladoo | Tilgul in English वेळ : २० मिनिटे , नग : ७ - ८ साहित्य : १ ) २ वाटया पांढरे ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/tilache-ladoo-sesame-ladoo-tilgul_15.html?m=0
वेळ : २० मिनिटे,   
नग: ७-८ 
साहित्य:
१) २ वाटया पांढरे तिळ 
२) १ वाटी शेंगदाणे  
३) ३ वाटया किसलेला गूळ 
४) १ छोटा चमचा वेलची पूड 
५) १/२ वाटी सुख खोबर 
कृती:
तिळ निवडून एका भांडयात कोरडे भाजून घ्यावे.
लालसर झाले की तडतडू लागतील. 
लगेचच एका ताटात काढून थंड करून घ्यावे. 
शेंगदाणे भाजून घ्यावे थंड झाले की साले काढून घ्यावी.
खोबर २-३ मिनिटे परतावे जास्त वेळ गरम करू नये.
आता वरील सर्व साहित्य एकत्र करावे तिळ, शेंगदाणे, खोबर, गूळ, वेलची पूड एकत्र करून घ्यावे. 
मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यावे. 
एका प्लेटमध्ये मिश्रण काढून घ्यावे. 
मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यावे.
तिळाचे लाडू तयार.
हे लाडू डब्ब्यात ठेवून टिकवता येतात.


