भोगीची भाजी | Bhogichi Bhaji
Bhogichi Bhaji in English: पूर्व तयरीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे बनवण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे २ व्यक्तींसाठी ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/bhogichi-bhaji_14.html?m=0
बनवण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे  
२ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) १/२ वाटी वाल पापडी  
२)  २-३ मध्यम आकाराची वांगी
३) १/२ वाटी वाटाने
३) १/२ वाटी वाटाने
४) १/४ वाटी ओले हरबरे  
७) १ वाटी बटाट्याच्या फोडी  
८) २ कांदे 
९) १ टोमॅटो 
१०)आंल लसूण पेस्ट 
११) कोथिंबीर 
१२) मालवणी मसाला 
१३) १ छोटा चमचा गूळ 
१४) तेल 
१५) मीठ चवीनुसार 
कृती:
एका भांडयात तेल गरम करून त्यात प्रथम कांदा लालसर भाजून घ्यावा.
त्यात आंल लसूण पेस्ट व बारीक़ चिरलेला टोमॅटो घालून ४-५ मिनिटे परतावा. 
एकदाका टोमॅटो शिजला की त्यावर चिरलेल्या भाज्या, मालवणी मसाला, गूळ व थोडेसे पाणी घालून परतावे.
भांडयावर झाकण ठेवून ५ मिनिटे मध्यम ग्यासवर शिजवावे. 
मध्येगरमच  मध्ये परतावे व भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.
भाजी शिजली की ग्यासवरुन बाजूला करावी. 
वरुन बारीक़ चिरलेली कोथिंबीर घालून  तांदुळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करावी.



