चिवूचि भाजी | Chiu Masala bhaji-Vidarbha Special Recipes


चिवूचि भाजी जस नाव तशीच नाजूक. चिवूचि भाजी अतिशय पौष्टिक, उन्हाळ्यात उन्हापासून शरीराला आराम देणारी थंड असलेली.
मी जेव्हा माझ्या सासरी अमरवतीला पहिल्या उन्हाळ्यात गेली तेव्हा पहिल्यांदा ही भाजी पाहिली.
ही नाजूक भाजी पाहून मला खर तर नवलच वाटल. 
आता ती बनवायची कशी याचा मला प्रश्न पडला.
माझ्या सासुबाईंनी अगदी सोप्या पद्धतीने मला शिकवली. 
आता तर मलाही ही भाजी खूप आवडते व आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो म्हणजे ही भाजी आवर्जून बनवली जाते.

चिवूचि भाजी 

पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ :१५ मिनिटे 
एकूण लागणारा वेळ : ३० मिनिटे 

भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

१) चिवूचि भाजी साधारण २-३ जुडया
२) दीड वाटी बेसन
३) ३ मोठे कांदे
४) १/२ कैरी  
५) मीठ चवीनुसार

फोडणीसाठी लागणारे साहित्य:

१) १  वाटी तेल
२) १ छोटा चमचा मोहरी
३) १ चिमूठ हींग
४) ३-४ चमचे लाल तिखट
५) हळद


कृती:

भाजी स्वच्छ निवडून घ्यावी त्यात असलेले गवत निवडून घ्यावे.चाळनिवर घेवून धुवून घ्यावी.

बारिक चिरून  घ्यावी.


ही भाजी ईतर पालेभाज्यांप्रमाणे निवडण्याची अवश्यक्यता नसते.

सोबत कैरी बारिक चिरून घ्यावी.


एका कढईत तेल गरम करावे व त्यात फोडणी तयार करावी.

तेल झाले की त्यात मोहरी घालावि ती तडतडली की लगेचच त्यात हींग घालावा.

बारिक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतावा.कांदा झाला की लाल मिरची पूड, हळद घालून परतावी व लगेचच चिरलेली भाजी घालून साधारण १० मिनिटे परतावी.

परतलेली भाजी रंग बदलू लागली की त्यात बेसन घालावे  परतून झाकण ठेवावे व बारिक ग्यासवर १० मिनिटे शिजू दयावी,भाकरी, चपाती किंवा भात यापैकी कशाही सोबत तुम्ही ही भाजी वाढू शकता.


Chiu bhaji recipe is a healthy leafy vegetable found in the Vidarbha region. This delicacy is savoured in eastern Maharashtra region.Try Now!

Tags: Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Vegetables 8088766764093648913

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item