Golyachi Amti (Maharashtrian Besan Kofta Curry) Recipes | गोळ्याची आमटी


पूर्व  तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ :  १५ मिनिटे
एकूण वेळ:  २५   मिनिटे

मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

१) ४- ५ लाल मिरच्या
२) २-३ छोटे  चमचे धणे 
३)  ४-५ लसूण पाकळ्या 
४) १ वाटी ओल खोबर 
५) १/२ कांदा 
६) हळद 
७) तेल 
८) कोकम २-३ 
९) मीठ  


गोळी बनविण्यासाठी लागणारे  साहित्य:

१) १ कांदा बारिक  चिरून घेतलेला 
२) लाल मिरची व धणे घालून बनविलेले वाटण 
३) १ वाटी चण्याचे पीठ 
४) मीठ चविनुसार 

कृती:

लाल मिरची व धणे साधारण १/२ तास भिजू घालावि.


भिजू घातलेली मिरची, धणे, लसूण एकत्रित पने मिक्सरला लावून बारिक पेस्ट करून घ्यावी. 


थोडीशी पेस्ट गोळी बनविण्यासाठी बाजूला करावी व उरलेल्या पेस्टमध्ये थोडेसे पाणी घालावे.




फोडणीसाठी तेल गरम करून त्यात बारिक चिरलेला कांदा घालून परतावे  व त्यावर वर करून ठेवलेले मसाल्याचे पाणी घालावे व चांगले उकळू दयावे. 




गोळे बनविण्याची कृती:

एका भांडयात बारिक चिरलेला कांदा, बेसन, मिरचीची पेस्ट, हळद, मीठ  व पाणी घालून थोडेशे घट्ट पीठ तयार करून घ्यावे.



ओल खोबर, कांदा, हळद  मिक्सरला लावून बारिक वाटून घ्यावे.


मसाल्याच्या पाण्याला उकळी आली की त्यात वरील मिश्रणाचे गोळे करून हळू हळू  सोडवे.



हे गोळे शिजले की आपोआप वर येतात.



मसाला शिजला की त्यात खोबऱ्याचे करून ठेवलेले वाटन, मीठ व कोकम घालून मध्यम ग्यासवर उकळी येवू दयावी.




गरमा गरम भातासोबत सर्व्ह करावी.


Tags: Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Vegetables 821778768000362696

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item