Tandalache Vade Recipe in Marathi | तांदुळाच्या पिठाचे वडे
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/06/tandalache-vade-recipe-in-marathi.html?m=0
Tandalache vade also known as rice poori is most popular recipe of rice flour recipes.Amti,Vatana Usal goes best with this golden-yellow vade.Try It!
बऱ्याचदा गृहिणींना
अगदी ऐन वेळी फरमाइश येते आज वडे बनव ना पण मालवणी वडे बनवायचे म्हणजे त्याला वेळ
जातो मग अश्या वेळी हे वडे तुम्ही बनवले तर तुमच्या मंडळींना
नक्की आवडतील.
मी शिकली माझ्या
आईकडून आणि आज खास तुमच्यासाठी मी ही रेसीपी लिहिली आहे तर आशा करते हे वडे तुम्ही
नक्की बनवाल व तुमच्या मंडळींना नक्की खायला दयाल.
पूर्व तयारीसाठी
लागणारा वेळ: १० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा
वेळ: १० मिनिटे
कृती स्रोत : माझी आई
साहित्य:
१) २ वाटया तांदळाचे
पीठ
२) १ ते दीड वाटी
कोमट पाणी
३) १/२ छोटा चमचा धणे
पूड
४) १/२ छोटा चमचा
जीरे पूड
५) १/२ छोटा चमचा लाल
तिखट व हळद
६) १/२ छोटा चमचा
मेथी पूड
७) मीठ चवीनुसार
८) १/२ वाटी तेल वडे
थापताना लागेल
९) तळनासाठी तेल
कृती:
एका मोठया भांडयात
तांदळाचे पीठ, धणे पूड, जीरे पूड, लाल तिखट, मेथी पूड, मीठ घालून हाथाने चांगले
मिक्स करून घ्यावे.
आता या मिश्रणात कोमट
पाणी थोडे थोडे करून घालावे.
साधारण घट्ट पीठ मळून घ्यावे.
तयार पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे.
या पीठाचे छोटे छोटे
लिंबूच्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
प्लास्टिक शीटला
थोडेसे तेल लावावे त्यावर पीठाचा बनवून घेतलेला एक गोळा ठेवावा व प्रथम बोटाने
दाबून हळूहळू तळहाथाने पसरून पूरी एवढा वडा बनवून घ्यावा.
लगेचच तेल गरम करून
त्यात हा वडा तळुन घ्यावा.
वडा तेलात सोडला की
झाऱ्याने थोडे थोडे तेल त्यावर घालावे व थोडेसे झाऱ्याने दाबावे म्हणजे तो फुगतो
मग तो परतावा व दुसऱ्या बाजूने तळुन घ्यावे.
गरमा गरम काळ्या
वाटण्याच्या उसळी किंवा आमटी सोबत सर्व्ह करावे.
Labels : maharashtrian Tandalache Vade,Vade, Vada, malvani vade, jhatpat vade,
cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor