Nachni Thalipeeth | Ragi Roti Recipe in Marathi | नाचणीचे पौष्टिक थालीपीठ
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/07/nachni-thalipeeth-ragi-flour-roti.html?m=0
Nachniche Thalipeeth in English:
Nachni Thalipeeth is an authentic Maharashtrian Breakfast/brunch recipe.Its easy-quick to be enjoyed with family usually at the start of the day.Read Here!
थालीपीठ म्हटले की भाजनी आलीच पण कधी कधी साधी पीठ घालून केलेली थालीपीठही खूप छान लागतात
नाचणीचे थालीपीठही असच काही आहे झटपट होते व चवीलाही छान लागते नक्की करून पहा.
१) २ वाटया नाचणीचे पीठ
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा:

वेळ:
२० मिनिटे
२-३ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) २ वाटया नाचणीचे पीठ
२) १ कांदा बारिक चिरुन घेतलेला
३) २ छोटे चमचे लाल मिरचीची पूड
४) १ छोटा चमचा जिरे
५) हळद
६) मीठ
७) कोथिंबीर बारिक चिरलेली
८) तेल
कृती:
एका भांडयात नाचणीचे पीठ, लाल मिरचीची पूड, हळद, जिरे व मीठ एकत्र करून घ्यावे.
त्यात बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर व आवश्यक तेवढे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
पीठ जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
पीठ जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
या पीठाचे एकाच आकाराचे समान गोळे करून घ्यावे.
प्लास्टिक पिशविला थोडेसे तेल लावून घ्यावे त्यावर तयार केलेला पीठाचा एक गोळा घेवून हळूहळू बोटांनी व तळहाथाने पसरून घ्यावा व थालीपीठ बनवावे.
थालीपीठाच्या मध्यभागी बोटाने छिद्र करावे.
तवा गरम करावा व त्यावर थोडेसे तेल घालावे व थापूण घेतलेले थालीपीठ अलगतपने तव्यावर सोडावे.
२-३ मिनिटांनी पुन्हा एकदा मधल्या छिद्रांमध्ये व आजूबाजूने तव्यावर तेल सोडावे.
एका बाजूने झाले की लगेचच परतून दुसऱ्या बाजूने ही खरपूस करून घ्यावे.

अश्याप्रकारे सर्व थालीपीठ करून घ्यावीत गरमच सर्व्ह करावी.
या थालीपीठासोबत दही, लोणच किंवा तळलेली हिरवी मिरची सुध्दा सर्व्ह करू शकता.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा:
Labels : maharashtrian Thalipeeth,Thalipeeth, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor