Green(Raw) Papaya Thalipeeth - Maharashtrian Recipes | कच्च्या (हिरव्या)पपईचे थालीपीठ


Green Papaya Thalipeeth has a unique character with respect to texture and taste.It has a sharp strong taste and smell owing to the natural flavour of raw papaya.This light green snack dish recipe is seasonal. Will be enjoyed by the first time makers-n-eaters wholeheartledly. Chew it hot with Curd or tomato ketchup.


पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
२ व्यक्तींसाठी


साहित्य:

१) १ वाटी हिरव्या  पपईच किस
२) २-३ लसूण पाकळ्या
३) १ छोटा चमचा जीरे
४) १ छोटा चमचा ओवा
५) १/२ छोटा चमचा हळद
६) १/२ छोटा चमचा लाल तिखट
७) मीठ चवीनुसार
८) १ वाटी ज्वारीचे पीठ
९) १/२ वाटी तांदळाचे पीठ
१०) १/२ वाटी बेसन
११) १ कांदा बारिक चिरलेला
१२) कोथिंबीर



कृती:


एका भांडयात पपईचा किस घ्यावा त्यात लसूण पाकळ्या ठेचून किंवा किसुन घ्यावा, बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जीरे, ओवा, हळद, लाल तिखट, मीठ, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन घालून  हाथाने चांगले मळुन घ्यावे.




आवश्यक वाटल्यास थोडेसे पाणी घालावे.




पीठ चांगले मळुन झाले की लगेचच तवा गरम करत ठेवावा.


आता या पीठाचे एकाच आकराचे गोळे करून घ्यावे.







तव्यावर या गोळ्याचे थालीपीठ थापून घ्यावे.





किंवा 


जमत नसल्यास प्लास्टिकच्या तुकड्यावर  वर एक गोळा घेवून खाली  दाखविल्याप्रमाणे हाथाने पसरून घ्यावा.







या थालीपीठाच्या मध्यभागी छिद्र करावे.


या छिद्रांमध्ये थोडे थोडे तेल सोडावे.


छान खरपुस भाजून घ्यावे.



एका बाजूने झाले की लगेचच परतून दुसऱ्या बाजूने ही भाजून घ्यावे.


दही किंवा टोमॅटो सॉस सोबत छान लागतात.




Labels : maharashtrian Thalipeeth,Thalipeeth, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Traditional 1718776016092461144

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item