Tilache Laddu | Til ladoo recipe in marathi | तिळाचे लाडू
https://nilamsrecipes.blogspot.com/2016/01/tilache-laddu-how-to-make-til-laddu-in.html
Sesame
adds flavour and texture to the food. Thinking on these lines, sesame laddus
are richly textured, awesomely flavoured and they taste simply divine. Made
from roasted sesame seeds and jaggery on the auspicious ocaasion of Sankrant
festival. Its crunchy but tooth-friendly. Read the full recipe of how to make
til laddu here. The recipe is best described with pictures. “Til gul ghya, god
god bola!”
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: ३० मिनिटे
नग ५०-६०
साहित्य:
१) पावकिलो पॉलिश तीळ
२) १ मोठा किसलेले सुके खोबरे
३) १ वाटी शेंगदाणे
४) पावकिलो चिकीचा गूळ
५) वेलची पूड
६) १ छोटा चमचा तूप
कृती:
तिळ मंद गॅसवर भाजून घ्यावे.
तडतडू लागले की उतरावे.
सुके खोबरे थोडेसे भाजून घ्यावे.
शेंगदाणे भाजून सोलुन घ्यावे व जाडसर कुटुन घ्यावे.
तीळ, खोबरे, शेंगदाणे एकत्र करून बाजूला करून ठेवावे.
एका पातेल्यात थोडेसे तूप घालून त्यावर गूळ घालावा पाणी घालू नये.
मंद गॅसवर पातळ होवू द्यावा.
एका वाटित पाणी घेऊन २-३ थेंब पाकाचे घालावे.
गोळी झाली की पाक झाला असे समजून त्यात एकत्र केलेले सर्व सामान घालून घ्यावे.
वेलची पूड घालून एकत्र करून घ्यावे.
तळ हाथाला थोडेसे तूप लावून मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्यावे.
थंड झाले की तयार लाडू हवाबंद डब्ब्यात भरून ठेवावे.