मालवणी काजू पोहे |Malvani Kaju Pohe
http://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/malvani-kaju-pohe.html
Malvani Kaju Pohe in English
वेळ :
१५ मिनिटे , २ व्यक्तीनसाठी.
साहित्य :
१)दगड़ी पोहे २ वाट्या
२)२ छोटे चमचे तेल
३)१/२ चमचा जीरे
४) १/२ चमचा मोहरी
५)१/२ चमचा हळद
६) कढीपत्ता
६) कढीपत्ता
७)२ हिरव्या मिरच्या
८)१ वाटी बारीक़ चिरलेला कांदा
९)१/२ वाटी अक्खे काजू
९)१/२ वाटी अक्खे काजू
१०)कोथिंबिर
११)लिंबु
१२)चवीनुसार मिठ
कृती :
पोहे चांगले धुऊन आणि मिठ व हळद लावून १० मिनिटे ठेवावे.
काजुंचे मधून उभे दोन भाग करून घ्यावेत.
नंतर एका कढ़ई मध्ये तेल गरम करुण त्यात मोहरी,जिरे,हिरवी मिरची,कढीपत्ता व कांदा
घालून परतून घ्यावेत.
कढीपत्ता व कांदा भाजला की प्रथम काजू घालावे आणि २-३मिनिटे चांगले परतून घ्यावे व नंतर त्यावर पोहे घालावे.
थोडेसे परतून झाकण लाऊन ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी.
एका प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर लिंबू पिळून, कोथिंबीर घालून खावयास घ्यावे .