मालवणी बटाटा पोहे | Malvani Batata Pohe

Malvani batata pohe in english

वेळ :  


१५ मिनिटे , २ व्यक्तीनसाठी.

साहित्य :

१)दगड़ी  पोहे २ वाट्या 
२)२ छोटे चमचे तेल 
३)१/२ चमचा जीरे 
४) १/२ चमचा मोहरी
५)१/२ चमचा हळद  
६) कढीपत्ता  
७)२ हिरव्या मिरच्या 
८)१ वाटी बारीक़ चिरलेला कांदा  
९)१मोठा बटाटा  
१०)१/२ वाटी ओल खोबरं 
११)बारीक सेव 
१२)कोथिंबिर
१३)लिंबु 
१४)चवीनुसार मिठ 


कृती :

पोहे चांगले धुऊन आणि मिठ व हळद  लावून १० मिनिटे ठेवावे. 

नंतर एका  कढ़ई मध्ये तेल  गरम करुण  त्यात मोहरी,जिरे,हिरवी मिरची,कढीपत्ता व कांदा घालून परतून घ्यावेत.   

कढीपत्ता  व कांदा भाजला की  प्रथम बटाटे घालावे आणि २-३मिनिटे चांगले परतून घ्यावे व नंतर त्यावर  पोहे घालावे.

थोडेसे परतून झाकण लाऊन ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी. 

एका प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर लिंबू पिळून प्रथम बारीक चिरलेलाकांदा  घालावा मग त्यावर ओल खोबर, शेव  व कोथिंबीर घालून खावयास घ्यावे . 

टीप :

बटाटे उकड्ण्यास वेळ नसल्यास बारीक काप करून फोडणीत घातल्यावर झाकण लावून वाफून घ्यावेत. 

Related

Breakfast 6525567989452151342

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item