मालवणी दडपे पोहे | Malvani Dadpe Pohe
http://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/malvani-dadpe-pohe.html
Dadpe pohe in English
वेळ :
१५ मिनिटे , २ व्यक्तीनसाठी.
साहित्य :
१)दगड़ी पोहे २ वाट्या२)२ छोटे चमचे तेल
३)१/२ चमचा जीरे
४) १/२ चमचा मोहरी
५)२ हिरव्या मिरच्या
६) कढीपत्ता
७)थोडीशी साखर
८)ओले खोबरे १/२ वाटी
९)कोथिंबिर
१०)लिंबु
११)१ वाटी बारीक़ फरसाण
१२)१/२ वाटी बारीक़ चिरलेला कांदा
१३)चवीनुसार मिठ
कृती :
पोहे चांगले धुऊन आणि मिठ लावून १० मिनिटे ठेवावे.
१३)चवीनुसार मिठ
कृती :
पोहे चांगले धुऊन आणि मिठ लावून १० मिनिटे ठेवावे.
नंतर एका कढ़ई मध्ये तेल गरम करुण त्यात फोडणीचे साहित्य घालावे.
कढीपत्ता थोडासा भाजलाकी त्यात पोहे घालावे.
थोडेसे परतून झाकण लाऊन ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी,नंतर त्यात थोडीशी साखर घालावी.
एका प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर लिंबू पिळून प्रथम बारीक चिरलेला कांदा घालावा मग त्यावर फरसाण,ओल खोबर,बारीक चिरलेली हिरवी मिरची व कोथिंबीर घालून गरमागरम खावयास घ्यावे .
टीप :
खाण्यास वेळ असल्यास आपण वेळेवर फरसाण घालून हे पोहे खाऊ शकतो.