साबुदाणा खीर| Sabudana kheer
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/05/sabudana-kheer.html
Sabudana kheer in English
उपवास म्हटला कि नेहमीचेच पदार्थ. तेलकट तुपकट या सर्वांपासुन सुट्टी हवी असेल तर मग आज बनवुया साबुदाण्याची खीर.
वेळ :
उपवास म्हटला कि नेहमीचेच पदार्थ. तेलकट तुपकट या सर्वांपासुन सुट्टी हवी असेल तर मग आज बनवुया साबुदाण्याची खीर.
वेळ :
२०मिनिटे , २ व्यक्तीन साठी .
साहित्य :
१)१/२ वाटी साबुदाणा
२)२ वाटया साईसोबत दुध
३)४ चमचे साखर
४)वेलची पूड
५)५-६ मनुका
६)२-३ बदाम
कृती:
साबुदाणा धुवून २ वाटया पाणी घालुन १-२ तास भिजु दयावा.
एका जाड बुडाच्या भांडयात दूध गरम करून भिजवलेला साबुदाणा आणि त्यातील पाणी घालावे.
मंद आचेवर चांगले उकळू दयावे साधारण १०-१५ मिनिटे. मध्येमध्ये ढवळत राहावे.
साखर घालून चांगले ढवळावे.
वरून वेलची पूड व बदामाचे काप घालवे.
हि खीर गरम किंवा थंड आवडीनुसार खावी.