गरम मसाला | Garam Masala Ingredients | Powder Recipes
Garam Masala in English वेळ: १५ मिनिटे साहित्य: १) १ छोटा चमचा काळी मिरी २) १ चमचा लवंग ३) ३-४ तमालपत्र ...
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/12/garam-masala_4.html
१५ मिनिटे
साहित्य:
१) १ छोटा चमचा काळी मिरी
२) १ चमचा लवंग
३) ३-४ तमालपत्र
४) २ हिरव्या वेलच्या
५) ४ मोठया वेलच्या (मसाल्याची काळी वेलची)
६) १-२ जायफळ पूड
७) १ दालचीनीची काडी
८) २-३ चक्री फूल
९) १ छोटा चमचा जिरे
१०) २ छोटे चमचे धणे
वरील सर्व पदार्थ एकत्र करून ते उन्हात २-३ दिवस ठेवावे.
किंवा
एक भांड गरम करून घ्या.
त्यात जायफळ सोडून वरील सर्व पदार्थ काळी मिरी, लवंग, तमालपत्र, हिरवी वेलची , मोठी वेलची, दालचीनीची काडी, चक्री फूल,जिरे व धणे घाला.
पुढचे किमान ३० सेकंद सतत ढवळत रहा.
छान खमंग आला की ग्यास वरुन बाजूला करून घ्या.
आता जायफळ पूड घालून परता.
एका ताटात किंवा पसरट भांडयात पसरून थोडेसे थंड होवू दया.
मिक्सर ग्राइंडरला लावून छान बारीक़ पूड करून घ्या.
पूर्ण थंड झाली की लगेचच हवा बंद बरणीत भरून ठेवावा.