हिरव्या हरभऱ्याची कचोरी | Green Chickpea Kachori Recipe | Cholia Kachori Recipe
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/03/green-chickpea-kachori_13.html
वेळ:
२५ मिनिटे
नग: ७-८ कचोरी
कचोरीचे आवरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) १ वाटी मैदा
२) ३ मोठे चमचे तेल
३) मीठ चवीनुसार
कचोरीचे सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) २ वाटया हरभरे
२) १ कांदा बारीक चिरलेला
३) १ छोटा चमचा जिरे
४) १ छोटा चमचा लाल मिरचीची पूड
५) १ छोटा चमचा हळद
६) कोथिंबीर
७) आल लसूण पेस्ट
८) २ छोटे चमचे तेल
९) मीठ चवीनुसार
इतर साहित्य:
१) तळनासाठी लागणारे तेल
कृती:
कचोरीचे आवरण कसे बनवावे:
आवरणासाठीचे लागणारे सर्व साहित्य एकत्र करावे व थोडेसे पाणी घालून हलक्या हाथाने पीठ मळावे.
साधरण ५-१० मिनिटे मळून घ्यावे.
या पिठाचे समान गोळे करून मऊ कापडाने झाकून ठेवावे.
कचोरीचे सारण कसे बनवावे:
एका भांडयात तेल गरम करावे त्यात हरभऱ्याचे दाणे २-३ मिनिटे परतून घ्यावे.
थंड झाले की मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यावेत.
पुन्हा एकदा थोडेसे तेल गरम करून त्यात जिरे, आल लसूण पेस्ट, लाल मिरची पूड, हळद, वाटून घेतलेले हरभरे व मीठ घालून परतावे.
हे मिश्रण साधारण ५ मिनिटे मंद ग्यासवर होवू दयावे.
बाजूला करून थंड होवू दयावे.
कचोरी कशी बनवावी:
आवरणासाठी बनवलेला एक गोळा घ्यावा पोळपाटावर लाटून त्याची जाडसर पूरी लाटून घ्यावी.
या पूरीवर मध्यभागी थोडेसे सारणाचे मिश्रण ठेवावे व हलक्या हाथाने पूरीच्या कडा जवळ करून पूरी बंद करून घ्यावी.
कचोरी व्यवस्तीत बंद झाली की नाही ते पहावे नाहीतर तळताना तेल आत जाते व ती तेलकट होते.
कधीकधी सारण देखील बाहेर येण्याची श्यक्यता असते म्हणून थोडीशी काळजी घ्यावी.
हळु हळू तळहाथाने दाबून पसरावे व छान कचोरी तयार करावी.
अश्याप्रकारे सर्व कचोऱ्या करून घ्याव्यात.
जास्त बनवत असाल तर ओल्या किंवा मऊ कपडाने झाकून ठेवाव्या.
एका कढईत तेल गरम करावे ग्यास मध्यम असावा.
मध्यम आचेवर खरपूस तळाव्यात.
एका बाजूने झाली की ती फुगते मगच पलटावी व दुसऱ्या बाजूने तळुन घ्याव्यात.
हिरव्या किंवा खजुराच्या चटणीसोबत खावयास दयावी.
Green Chickpea Kachori (Cholia Kachori) recipe is very easy and fast. So munch on this crispy and crunchy Green Chickpea Kachori (Cholia Kachori) with your family now. Check here..
Labels: Cookware & Bakeware, Kitchen Storage, Dining & Serving.