Phodnichi Chapati | फोडणीची चपाती

Phodnichi Chapati in English: वेळ: १५ मिनिटे, २ व्यक्तींसाठी . साहित्य: १ ) ५-६ -6 चपात्या (आदल्यादिवशीच्या) २) १ क...



वेळ:
१५ मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.

साहित्य:

) ५-६ -6 चपात्या (आदल्यादिवशीच्या)
२) १ कांदा बारिक चिरलेला  
३) २ चमचे तळलेले काजू 
४) १/२ छोटा चमचा लिंबाचा रस 
५) मीठ चवीनुसार 
६) १ छोटा चमचा साखर 
७) बारिक चिरलेली कोथिंबीर 

फोडणीसाठी लागणारे साहित्य:

१) २ छोटे चमचे तेल 
२) एक चिमुट मोहरी 
३) एक चिमुट जिरे 
४) ५-६ कढीपत्त्याची पाने 
५) एक चिमुठ हींग 
६) १/४ छोटा चमचा हळद 
७) १/२ चमचा लाल मिरची पूड 


कृती:

शिळया पोळ्या मिक्सरला लावून बारिक करून घ्याव्या व बाजूला करून ठेवावे
.


फोडणीसाठी तेल गरम करून घ्यावे त्यात मोहरी घालावी. 

मोहरी तडतडली की जिरे, हींग, कढीपत्त्याची पाने, हळद व लाल मिरची पूड घालावी.


बारिक चिरलेला कांदा घालून छान परतावा. 

तळलेले काजू घालून परतावे. 

बारिक केलेली चपाती घालून मंद ग्यासवर परतून घ्यावी. 

मीठ व साखर घालून झाकण ठेवावे २ मिनिटे होवू दयावे.

बारिक चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस घालून गरमच खावयास दयावे.




Related

Marathi Recipes 1695753272702597118

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item