मालवणी नारळी पोहे | Malvani Narali Pohe
https://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/malvani-narali-pohe.html?m=0
मालवणी नारळी पोहे ( Malvani Narali Pohe )
वेळ :
१५ मिनिटे , २ व्यक्तीनसाठी.
साहित्य :
१)दगड़ी पोहे २ वाटया
२)२ वाटया खवलेल खोबर
३)१/२ वाटी किसलेला गुळ
४) १/२ छोटा चमचा वेलची पूड
५)१/२ छोटा चमचा जायफळ पूड
६)चवीनुसार मिठ
कृती :
प्रथम नारळाचे जाडसर दुध काढून घ्यावे नंतर थोडेसे पाणी टाकून पातळ दुध काढून घ्यावे त्यात गुळ,वेलची आणि जायफळ पूड घालावी.
पोहे पातळ दूधाने भिजून घ्यावेत त्यात मिठ घालावे.
नंतर त्यावर जाडसर दुध टाकावे आणि पोहे एकजीव करून घ्यावेत.