वालाची उसळ

Valachi Usal in English 

वेळ :  

१५ मिनिटे (भिजवण्याचा आणि मोड काढण्याचा वेळ वगळून)
२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)१ वाटी भिजवलेले वाल 

२)२छोटा चमचा तेल  
३)हळद
४)मालवणी मसाला २ चमचे किंवा आवडीनुसार 
५)कांदा एक मोठा 
६)१ वाटी खवलेले ओलें खोबरे 
७)४-५ कढीपत्त्याची पाने 
८)कोथिंबीर 
९)१ टोम्याटो 
१०)आवडीनुसार मिठ 


कृती :

वाल  ६-७ तास भिजवून घ्यावे. कापडात बांधून मोड येऊ दयावे. 
एका भांडयात तेल गरम करुण कढीपत्ता घालून बारिक चिरलेला अर्धा कांदा घालून परतावं.  कांदा चांगला  लाल होयी पर्यंत भाजावा. आता त्यात वाल घालून चांगले परतावे. थोडसं पाणी घालून मालवणी मसाला घालून झाकण ठेऊन मध्यम ग्यासवर मसाला चांगला उकळू दयावा. 
एका भांडयात एक चमचा तेल घालून त्यात कांदा भाजून ओलं खोबर हि भाजून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारिक वाटून घ्यावं. मसाला शिजला  की हे वाटण आणि बारीक चिरलेला  टोम्याटो  त्यात घालावं. सोबत मिठ व घालावा. वरून छान कोथिंबीर घालावी.

Related

Dal-Usal-Kadhi 5418917631472937857

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item