Sabudana Chivda | साबुदाना चिवडा

वेळ :
१५ मिनिटे
१) १ कप नायलॉन साबुदाना ( हा साबुदाना वेगळा असतो खिचड़ी साठी जो वापरला जातो तो वापरु नये)
२) १/२ कप शेंगदाणे
४) तळनासाठी तेल
५) मीठ चवीनुसार
६) पीठी साखर
एका भांड्यात तेल गरम करून साबुदाना चांगला फुलवून घ्यावा.
पेपर वर काढून घ्यावा म्हणजे त्यातील तेल निघून जाईल.
त्याच तेलात शेंगदाणे व खोबरयाचे तुकडे तळुन घ्यावे व पेपर वर काढून एक्स्ट्रा तेल काढून घ्यावे.
एका भांड्यात तळलेले साबुदाने, शेंगदाणे, खोबरयाचे तुकडे घेऊन त्यावर पीठी साखर, मीठ घालून हाताने मिसळून घ्यावे.
आवडत असल्यास तिखट किंवा हिरवी मिरचीही घालु शकता.
तयार चिवडा हवा बंद डब्यात भरून ठेवावा.
हवा असल्यास खावयास घ्यावा.