Corn Flour Thalipeeth in English वेळ : १०मिनिटे , २ व्यक्तीन साठी . साहित्य : १ ) मक्याचे पीठ २ वाट्या ...
१०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) मक्याचे पीठ २ वाट्या
२) १मोठा कांदा
३) १ छोटा चमचा लाल तिखट
४) १/२ चमचा जिरे
५) हळद
६) चविनुसार मीठ
७) कोथिंबीर
८)तळणासाठी तेल
कृती :
प्रथम एका भांड्यात मक्याच पीठ घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा,लाल तिखट,जिर, बारिक चिरलेली कोथिंबीर मीठ व हळद घालून घ्या.
आवश्यक पाणी घालून घट्ट पिठ मळून घ्यावे.
१० मिनिटे बाजूला करून ठेवावे.
एका प्लास्टिकच्या तुकड्यावर थोडस तेल हाथाने पसरावे.
पीठाचा एक एक गोळा करून तो प्लास्टिकच्या तुकड्यावर हळूहळू बोटाच्या किंवा तळ हाथाच्या सहाय्याने पसरावे.
पसरून झाल की लगेचच गरम तव्यावर टाकावे बाजूने थोड थोड तेल सोडावे.
दह्यासोबत गरमच सर्व्ह करा.