मेथी भाजी
Methi Bhaji in English वेळ : २० मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) अडीच वाटी मेथीची पाने २ ) ४ - ५ ला...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/methi-bhaji_10.html
२० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
१) अडीच वाटी मेथीची पाने
२) ४-५ लासनाच्या पाकळ्या
३) १ बारीक़ चिरलेला कांदा
४) ४ हिरव्या मिरच्या
५) १/२ चमचा जिरे
६) २ छोटे चमचे तेल
७) हळद
८) धने पूड
९) १/२ छोटा चमचा साखर
१०) मीठ चविनुसार
११) २ मोठे चमचे पानी
१२) ओल खोबर
कृती:
मेथिची पाने धुवून बारीक़ चिरून बाजूला करून ठेवावी.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे घालावे.
जिरे झाले की लगेचच बारीक़ चिरलेला कांदा घालून तो खमंग भाजून घ्यावा.
लासनाच्या पाकळ्या घालून त्या भाजून घ्या.
बारीक़ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धने पूड, हळद व मीठ घालून चांगले परतून घ्या.
एकदाका हे पदार्थ परतून झाले की लगेचच बारीक़ चिरलेली मेथी घालून मंद ग्यासवर ३ मिनिटे परतवे.
तेल सुटू लागले की लगेचच पानी घालून परता.
मंद ग्यासवर साधारण २-३ मिनिटे शिजू दया.
वरुन ओल खोबर घालून सर्व्ह करा.