मुळ्याच्या पानांचे बेसन
Mulyachya Pananche Besan in English वेळ: २० मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) १ कप बारिक चिरलेला ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/mulyachya-pananche-besan.html
२० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) १ कप बारिक चिरलेला मुळ्याचा पाला
२) १ कप बेसन
३) हळद
४) मिठ चवीनुसार
५) ४-५ हिरव्या मिरच्या
६) ५-६ लसुन पाकळ्या
७) १/२ छोटा चमचा जिरे
८) १/२ छोटा चमचा मोहरी
९) कढीपत्त्याची पाने
१०) कोथिंबीर
११) तेल फोडणीसाठी
कृती:
एका कढईत तेल गरम करून त्यात प्रथम ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून लालसर तळून घ्याव्यात.
आता त्यात मोहरी, जिरे, कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,बारिक चिरलेला कांदा घालून लालसर भाजून घ्यावा.
कांदा लालसर झाला कि बारिक चिरलेला मुळ्याचा पाला घालून चांगले ढवळून घ्यावे.
बेसण कोरडेच घालून छान ढवळून घ्यावे पाणी थोडे थोडे करून घालावे जास्त पाणी घालू नये नाहीतर झुणका पातळ होतो.
चांगले ढवळून घ्यावे म्हणजे गुठळ्या होणार नाही.
झाकण लावून ५ मिनिटे बारिक ग्यासवर शिजू दयावे.
भाकरी किंवा चपतीसोबत खावयास दयावे.