मेथी वडी
MethiVadi in English वेळ : २५ मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) १ छोटी जूडी मेथीची भाजी २ ) १ वाटी ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/methi-vadi_11.html
२५ मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
१) १ छोटी जूडी मेथीची भाजी
२) १ वाटी डाळीचे पीठ
३) ५-६ हिरव्या मिरच्या
४) कोथिंबीर
५) १/२ चमचा जिरे
६) हळद
७) धने पूड
८) मीठ चविनुसार
९) पाणी आवश्यकतेनुसार
१०) तेल तळनासाठी
११) ओल खोबर
११) ओल खोबर
कृती:
मेथिची पाने व कोथिंबीर धुवून बारीक़ चिरून घ्या.
एका भांड्यात चिरलेली मेथी व कोथिंबीर घेवून त्यात डाळीच पीठ, बारीक़ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे, हळद, धने पूड व मीठ एकत्र करून घ्या.
आवश्यकतेनुसार पानी घालून घट्ट पीठ भिजवून घ्या.
नंतर प्रेशर कूकर मध्ये एका चाळनीवर हे पीठ पसरून उकड़ काढून घ्यावी.
कुकरला शिट्टी लावू नये साधारण १०-१५ मिनिटे उकडून घ्या.
थंड झाल्या की लगेचच वड़या कापून छान खुसखुशीत तळुन घ्या.
वरुन ओल खोबर पसरून लगेचच हिरवी चटनी किंवा कैच अप सोबत गरमच खावयास घ्या..