झटपट भरलेली वांगी | Stuff Eggplant
Stuff Eggplant in English वेळ : २० मिनिटे , २ व्यक्तीन साठी . साहित्य : १ ) ४-५ मध्यम आकाराची वांगी २ )...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/12/stuff-eggplant.html
वेळ :
२० मिनिटे,
२ व्यक्तीन साठी.
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) ४-५ मध्यम आकाराची वांगी
२) २ मोठे कांदे
३) २ टोमॅटो
४) ३-४ चमचे शेंगदाण्याचे कूट
५) २ छोटे चमचे मालवणी मसाला
६) १/२ छोटा चमचा जिरे व धणे पूड
७) तेल
८) हळद
९) कोथिंबीर
१०) आवडीनुसार मीठ
कृती :
टोमॅटो व कांदा चिरून त्यात धणे जिरे पूड, शेंगदाण्याच कूट, मालवणी मसाला, हळद व मीठ घालून हे मिश्रण मिक्सला लावून सारण करून घ्यावे व बाजूला करून ठेवावे.
वांगी स्वच्छ धवून घ्यावी. देठांना जर काटे असतील तर काढून टाकावे.
सारण वांग्यात भरावे.
एका भांडयात तेल गरम करावे. एक एक करून अलगदपणे सारण भरलेली वांगी घालावी.
थोडीशी लालसर भाजून घ्यावी. वरून सर्व उरलेल सारण घालून घ्यावे.
थोडेसे पाणी घालावे. मध्येमध्ये वांगी परतत राहावी.
मंद ग्यासवर शिजू दयावे.
वरून झाकण ठेवावे, या झाकणात थोडेसे पाणी घालवे म्हणजे वाफेने वांगी लवकर शिजतात.
हे पाणी वांग्यात घालावे.
वांगी शिजली कि वरून छान कोथिंबीर घालावी.
भरलेली वांगी चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाण्यास घ्यावी.