दूधीच्या वडया | Doodhichya Vadya
Doodhichya Vadya in English वेळ : २५ मिनिटे , २ - ३ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) २ वाटया किसलेला दूधी २...
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/doodhichya-vadya.html
वेळ:
२५ मिनिटे,
२-३ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) २ वाटया किसलेला दूधी
२) १ वाटी बेसण
३) २ छोटे चमचे तांदूळ पीठ
४) १/२ छोटे चमचे लाल मिरची पूड
५) १/२ वाटी बारिक चिरलेली कोथिंबीर
६) १/२ छोटा चमचा आलं लसूण पेस्ट
७) १/२ छोटा चमचा हळद
८) १ छोटा चमचा जिरे
९) मीठ चवीनुसार
१०) तेल तळनासाठी
कृती:
एका भांडयात किसलेला दूधी, बेसण, तांदळाचे पीठ, हळद, जिरे, लाल मिरची पूड, आलं लसूण पेस्ट व मीठ घालून चांगले एकजीव करून घ्या.
पाणी घालण्याची आवश्यकता नाही कारण दूधीला पाणी सुटते त्यातच पीठ मळुण घ्यावे.
तळहाथाला थोडस तेल लावून वरील मिश्रणाचे रोल बनवून घ्यावे.
एका प्लेटला थोडेसे तेल लावून वरील रोल त्यावर ठेवावे.
प्रेशर कूकरला शिट्टी न लावता वरील रोल साधारण १०-१५ मिनिटे उकडून घ्यावे.
सुरीने कापून पहावे जर सुरीला मिश्रण चिकटले तर अजून थोडावेळ उकडावे.
थंड झाल्यावर तुकडे पाडून घ्यावे.
गरम तेलात कुरकुरित तळुन घ्यावे किंवा शालो फ्राय करून घ्यावे.
हिरव्या चटणीसोबत खावयास दयावी.