गाजर हलवा । Carrot Halwa

Carrot Halwa in English तयारीसाठी   लागणारा   वेळ  :  १५   मिनिटे   बनवण्यासाठी   लागणारा   वेळ :  १   तास    २   व्यक्तींसाठ...

Carrot Halwa in English


तयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे 
बनवण्यासाठी लागणारा वेळ: १ तास  
२ व्यक्तींसाठी.

साहित्य:
१)  १/२ किलो गाजर 
२) साखर १ कप
३) १/२ लिटर दूध  
४) ३ मोठे चमचे तूप  
५) १/४ छोटा चमचा 
६) १/२ वाटी बदाम, काजू व मनुका 

कृती:

गाजर स्वच्छ धुवून घ्यावे.

साल काढून किसुन घ्यावी व बाजूला करून ठेवावे. 

जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे व त्यात किसलेले गाजर घालून मंद गॅसवर 
ढवळावे.

साधारणतः १५-२० मिनिटांनी गजराचा रंग बदलू लागेल. 

लगेचच दूध घालून गॅस थोडा मोठा करावा व दूध पूर्ण आटेपर्यंत मध्ये मध्ये ढवळत राहावे.

दूध आटले की वेलची पूड व साखर घालावी.

मिश्रण खाली  चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.


बदाम, काजूचे काप व मनुका घालावे.

थंड  किंवा  गरम  आवडीनुसार  खावयास घ्यावा. 



Related

Sweets 2946679091095779883

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item