तांदळाच्या शेवया व नारळाचा रस | Tandalacya Shevaya aani Naralacha Ras
Rice Shevya with Coconut Milk in English बनवण्यासाठी लागणारा वेळ : १ / २ तास २ व्यक्तींसाठी शेवयां बनवण्यासाठी...
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/tandalacya-shevaya-aani-naralacha-ras.html
२ व्यक्तींसाठी
शेवयां बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) ४ वाटया तांदळाचे पीठ
२) मीठ चवीनुसार
३) पाणी
३) पाणी
नारळाचा रस बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) ओल खोबर २ वाटया
२) १ वाटी किसलेला गूळ
३) मीठ चवीनुसार
४) वेलची पूड
शेवयांची कृती:
तांदळाच्या पीठात मीठ व गारम पाणी घालून थोडे घट्ट मळून घ्यावे.
एका पातेल्यात जास्तचे पाणी गरम करत ठेवावे.
पाण्याला उकळी आली की वरील पीठाचे बेताच्या आकाराचे लांबाट गोळे करून त्यात सोडावे व १०-१५ मिनिटे उकडू दयावे.
हे गोळे गरमच शेवयाच्या सोऱ्यात घालून लगेचच शेवया पाडून घ्याव्यात.
नारळाचा रस बनवण्याची कृती:
ओल खोबर थोडस पाणी घालून मिक्सला लावून त्याच दूध काढून घ्यावे.
त्यात किसलेला गूळ, वेलची पूड व थोडेसे मीठ घालून चांगले ढवळून घ्यावे.
शेवया नारळाच्या रसासोबत सर्व्ह कराव्यात.