Masala Chai | मसाला चाहा

Masala Chai in English: तयारीसाठी   लागणारा   वेळ  :  ६ - १०   मिनिटे     बनवण्यासाठी   लागणारा   वेळ  :  १०   मिनिटे   २   व्...



तयारीसाठी लागणारा वेळ : ६-१० मिनिटे  
बनवण्यासाठी लागणारा वेळ : १० मिनिटे 
२ व्यक्तींसाठी.

मसाल्यासाठी लागणारे साहित्य:

१) १ इंच दालचिणी  
२) ४ हिरव्या वेलच्या
३) १२-१४  काळी मिरी 
४) १/४ छोटा चमचा जायफळ पूड 


चाहासाठी लागणारे साहित्य:

१) १ कप पाणी  
२) १ कप दूध  
३) ३ छोटे चमचे साखर 
४) २ छोटे चमचे चाहा पावडर  


कृती:

वरील मसाल्याचे साहित्य मिक्सरला लावून त्याची पूड करून घ्यावी. 

थंड झाली की लगेचच चाळुन  एका हवाबंद डब्ब्यात ठेवावी.

हा मसाला तुम्हाला हवा तेव्हा वापरता येईल.

एका भांडयात १ कप पाणी उकळत ठेवावे त्यात चाहा पूड, साखर, चाहा मसाला व  एक  कप दूध घालून चांगली उकळी येवू दयावी.

उकळी आली की चमच्याने चांगले ढवळुन घ्यावे.

२-३  मिनिटांनंतर गाळून चाहा गरमच दयावा.



  

Related

Marathi Recipes 6618407114313759625

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item