Moong Dal Varan recipe | हिरव्या मुगाच्या डाळीचे वरण

Moong Dal Varan in English

Moong Dal Varan is highly protein-rich foodstuff for vegans. This Varan(similar to Dal Tadka) is a nice pair with chawal/roti.


पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १ तास 
बनवण्यासाठी लागणारा वेळ: २० मिनिटे 
२ व्यक्तींसाठी.

साहित्य:

डाळीसाठी लागणारे साहित्य:

१) १ वाटी हिरवी मूग डाळ 

२) १ इंच आल्याचा टुकडा बारिक चिरलेला 

३) १ बारिक चिरलेला टोमॅटो 

४) १ उभा चिरलेला कांदा 

५) १ छोटा चमचा हळद 

६) १/२ चमचा साखर 

७) मीठ चवीनुसार 

८) वरुन घालण्यसाठी कोथिंबीर 

फोडणीसाठी लागणारे साहित्य:

१) तेल 

२) १/२ छोटा चमचा मोहरी 

३) १/२ छोटा चमचा जिरे 

४) चिमुठभर हींग 

५) ४-५ कढीपत्त्याची पाने 

६) १ छोटा चमचा लाल मिरची पूड 


पूर्व तयारी: 

डाळ २-३ पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी.

३ वाटया पाणी घालून १ तास भिजू घालावी.

moong dal varan

कांदा, टोमॅटो व कोथिंबीर चिरुन घ्यावी.

कृती:

प्रेशर कूकरमध्ये भिजू घातलेली डाळ पाण्यासहित घालावि त्यात आंल, टोमॅटो, कांदा, हळद व मीठ  घालून घ्यावे.

झाकण लावून घ्यावे व ३-४ शिट्या काढाव्यात ग्यास मंद करून १० मिनिटे बारिक ग्यासवर डाळ शिजू दयावी. 

१० मिनिटांनी ग्यास बंद करून कूकर थंड होवू दयावा. 

डाळ थंड झाली की घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालावे. 

फोडणीसाठी छोटया कढई मध्ये तेल गरम करावे त्यात मोहरी घालावी.

मोहरी तडतडली की त्यात जिरे, हींग, कढीपत्ता घालावा तो झाला की ग्यास बंद करावा व लाल तिखट घालावे.

ही फोडणी वरणावर घालावी.

लाल तिखट ग्यास बंद करून घातल्यास करपत नाही व वरणाला रंग ही छान येतो.

चमच्याने ढवळून घ्यावे व वरून बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

चपाती किंवा भाता सोबत आवडीनुसार सर्व्ह करावी.




Moong Dal Varan is highly protein-rich foodstuff for vegans. This Varan(similar to Dal Tadka) is a nice pair with chawal/roti.

Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Recent 3853039824061354288

Post a Comment

  1. Hi, I was wondering if you would be willing to give me a copy of this recipe in English? I would love to cook this recipe but unfortunately I can't read Marathi and the translation is coming out strangely...

    ReplyDelete

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item