Kairiche Lonche | Raw Mango Pickle Recipe in Marathi | कैरीचे लोणचे
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/06/kairiche-lonche-raw-mango-pickle-recipe_11.html
Raw Mango Pickle in English:
Kairiche Lonche or Raw Mango Pickle Recipe - mostly enjoyed with dal-rice,paratha etc.Check here the Marathi traditional & household way of preparing it!
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: ३० मिनिटे
कृती स्रोत : माझी आई
साधारण १/२ किलो
साहित्य:
१) १/२ किलो
कैरी
२) २५० ग्रॅम तेल
३) १५०
ग्रॅम लाल मिरची पूड
४) १ छोटा चमचा मेथी
५) २ छोटे चमचे हळद
६) १ छोटा चमचा हींग
७) ५० ग्रॅम मोहरीची
डाळ
८) मीठ चवीनुसार
कृती:
मेथी दाणे कोरडे
तव्यावर भाजून घ्यावे ३-४ मिनिटे परतल्यावर त्याचा सुगंध येईल मग
लगेचच एका प्लेट मध्ये काढून घ्यावी.
त्याच गरम भांडयात
तेल घालून गरम करावे व ग्यास वरुन बाजूला करून पूर्ण थंड होवू दयावे.
मेथीचे दाणे मिक्सरला
लावून त्याची पावडर करून घ्यावी.
कैऱ्या धुवून
घ्याव्या व कपड्याने फुसुन कोरडया करून घ्याव्यात.
कैरीच्या फोडी करून घ्याव्या.
मोठया भांडयात कैरीच्या फोडी, हळद, मीठ सर्व एकत्र करून १/२ तास
ठेवावे.
१/२ तासानंतर त्यात
लाल मिरची पूड, मोहरीची डाळ, मेथी पूड व हींग घालावा.
आता वरील मिश्रणात
थंड करून घेतलेल तेल घालून हाथाने चांगले मिक्स करून घ्यावे.
आता वरील मिश्रण १ दिवस तसेच झाकून ठेवावे.
दुसऱ्या दिवशी हे
लोणचे एका काचेच्या हवाबंद बरणीत ठेवावे.
आंबट व झणजनित कैरीच
लोणच तयार.
टिप:
लोणच्याची कैरी
निवडताना ती कडक पाहून घ्यावी,
कैरी नरम असल्यास
लोणचे लवकर ख़राब होते,
शक्यतो कैरी वजनाने
हलकी घ्यावी म्हणजे त्यात कोय छोटी असते व फोडी जास्त होतात.
लोणच्याची बरनी कोरडी
असावी.
पाणी लागणार नाही
याची दक्ष्यता घ्यावी नाही तर लोणच्याला बुरशी लागते.
अश्या प्रकारे काळजी
घेवून लोणचे केले तर ते छान तर होतेच पण ते टिकतेही.