Tandalache Papad | Rice Papad Recipe in Marathi | तांदळाचे पापड

Rice Papad in English


Tandalache Papad | Rice Papad Recipe in Marathi is a side dish preparation which goes well with dal-rice, khichdi etc.How to make rice papad? Learn Here!


बनविण्यासाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे  

साहित्य:

   १) १ किलो तांदूळ
   २) १/२ वाटी पांढरे तिळ 
   ३) पाणी 
   ४) आंल लसूण पेस्ट 
   ५) हिरव्या मिरचिचा ठेचा 
   ६) मीठ 

कृती:

तांदूळ निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.

ह्या तांदळामध्ये मापक पाणी ठेवून ३ दिवस भिजू घालावे.

रोज सकाळी पाणी बदलावे म्हणजे तांदळाला वास लागणार नाही.

३ दिवसानंतर पाणी उपसून तांदूळ मिक्सरला लावून बारिक वाटून घ्यावे व त्याच बारिक पिठ करून घ्यावे.
एका जाड बुडाच्या कढईत पीठ काढून घ्यावे व थोडेसे पाणी घालून मिश्रण ढवळावे.

ही कढई ग्यास वर ठेवावी व मिश्रण ढवळावे.

या मिश्रणात पांढरे तिळ, आंल लसूण पेस्ट, मिरचीचा ठेचा व मीठ घालावे. 


काही मिनिटांनी हे मिश्रण घट्ट होवू लगेल मग त्यावर एक झाकण ठेवावे व साधारण १० मिनिटे शिजू दयावे.या मिश्रणाचा रंग बदलेल तेव्हा हे मिश्रण खाली उतरावे व गरम असतानाच हाथाला तेल लावून या मिश्रणाचे खाली दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे गोले करून घ्यावे.पोळपटावर प्लास्टिक शीट ठेवावी व त्यावर एक गोळा ठेवून वरुन पुन्हा तिच प्लास्टिक शीट दूमडून लाटनीने पापड लाटून घ्यावा.

किंवा पापड मशिन असल्यास खाली दाखविल्याप्रमाणे पापड करून घ्यावे.
हे तयार पापड किमान ३-४ दिवस उन्हात ठेवावे.


वाळल्यावर हे पापड एका हवाबंद डब्ब्यात ठेवावे व खिचडी किंवा वरण भाता सोबत खावे.


हे पापड १ वर्ष टिकटात.

Related

Traditional 7784906333973290667

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item