Besan Kanda Kachori Recipe in Marathi | बेसन कांदा कचोरी
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/11/besan-kanda-kachori-recipe-in-marathi.html
Besan kanda kachori is a perfect snack you will always love to have. It is crispy, onion-stuffed kachori is time-consuming but is worth the effort. It is naturally flavoured and inhibits a natural sweet, spicy taste of the fried onion which is used in the filling. It is brittle and once broken spreads to numerous small flakes, thus, making it more enjoyable. Besan kanda kachori is best enjoyed with fried green chillies or tamarind chutney. Read here and Try it!
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
२ व्यक्तींसाठी
सारणासाठी लागणारे साहित्य:
१) १ वाटी बेसन
२) २ छोटे कांदे
३) बारीक चिरलेली कोथिंबीर
४) हिरवी मिरची
५) लाल मिरची पूड
६) बडीशेप
७) आल लसूण पेस्ट
८) गरम मसाला पूड
९) मीठ चवीनुसार
१०) तळनासाठी तेल
आवरणासाठी लागणारे साहित्य:
१) १ वाटी मैदा
२) १ छोटा चमचा तेल मोहनासाठी
३) मीठ चवीनुसार
४) पाणी पीठ मळण्यासाठी
कृती:
एका भांड्यात थोडेसे तेल घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा.
कांदा झाला की त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल मिरची पूड, बडीशेप, आल लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर व मीठ घालून परतून घ्यावे.
आता वरील मिश्रणात बेसन घालून मंद आचेवर परतावे.
थोडासा पाण्याचा हपका मारावा.
मिश्रण खमंग व दानेदार होईपर्यंत परतत राहावे.
हे मिश्रण आचेवरून बाजूला करुन थंड होवू दयावे.
तोपर्यंत एका भांड्यात मैदा घ्यावा त्यात मीठ मिसळावे.
तेलाचे कडकडीत मोहन करावे व मैद्याच्या मिश्रणात घालून चमच्याने चांगले एकजीव करावे.
आवश्यतेनुसार बेताचे पाणी घालून थोडेसे घट्ट पीठ मळुन घ्यावे.
पीठ जास्त घट्ट किंवा सैल होणार नाही याची काळजी घ्यावी.
पीठाचे सामान भाग करून एका आकाराचे गोळे करून घ्यावे.
गोळ्याला वाटीचा आकार देवून त्यात तयार कांद्याचे मिश्रण भरावे व वाटीच्या सर्व बाजू जवळ करून कचोरी बनवावी.
अश्याप्रकारे सर्व कचोऱ्या बनवून घ्याव्यात.
तळण्यासाठी वेळ असल्यास कचोऱ्या ओल्या कपड्याने झाकून ठेवाव्या.
एका कढईत तेल गरम करून एक एक कचोरी दोन्ही बाजूंनी करपुस तळुन घ्याव्या
गरमा गरम खावयास द्यावा.
Labels : Kachori, Besan Recipes, onion recipes, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor
I came across your blog while looking for some kachori recipes and liked a lot. How amazing! I will keep an eye on your post.
ReplyDelete